उस्मानाबाद /प्रतिनिधी-
आ. राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांनी आज दि. १३ मे २०१९  रोजी उस्मानाबाद व कळंब येथे बैठका घेवून या दोन्ही तालुक्यातील तीव्र दुष्काळी परिस्थीतीचा आढावा घेतला. या दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना व जनावरांना आवश्यक पाणी पुरविले जात नाही. वास्तवीक पाहता दुष्काळामध्ये प्रतिदिन दर माणसी २० लिटर, मोठ्या  जनावरांसाठी ४० लि. व लहान जनावरांसाठी १५ लि. पाणी उपलब्ध करुन देणे शासनास बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील एकाही गावामध्ये  लोकसंख्या व पशुधन संख्येच्या प्रमाणात पाणी उपलब्ध करुन दिले जात नाही. टँकरला निर्धारित करुन दिलेल्या खेपा अपूऱ्या  पाणी स्त्रोतामुळे अथवा भारनियमनामुळे पूर्ण होत नाहीत. २०११ च्या जनगणनेमध्ये १५% वाढ करत लोकसंख्या ग्रहीत धरुन लोकसंख्या व पशुधनाच्या प्रमाणात पाण्याची मागणी करण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या बैंठकी मध्ये उपस्थित सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. 
जिल्ह्यात चाऱ्याची प्रचंड टंचाई असताना  एकुण पशुधनाच्या केवळ १०% जनावरेच छावणीमध्ये आहेत. प्रशासनाकडून प्रस्तावात त्रुटीचे कारण देत मागणी प्रमाणे चारा छावण्यांना मंजूरी दिली जात नाही. त्यामुळे सेवाभावी संस्थांऐवजी शासना मार्फतच चारा छावण्या चालवाव्यात अथवा चारा डेपोच्या माध्यमातून दावणीला चारा उपलब्ध करुन द्यावा अथवा पशुधन संख्येच्या प्रमाणात थेट पशुपालकांच्या खात्यावर अनुदान जमा करावे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 
दिवसाच्या भारनियमनामुळे महिला बालकांसह नागरिकांना रात्रभर जागरण करुन पाणी भरावे लागत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेवून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना अधिग्रहनाची यादी पाठविली आहे व या ठिकाणी भारनियमनाच्या वेळापत्रकामध्ये बदल करून दिवस वीज पुरवठा सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.  
रब्बी पूर्णत: वाया गेल्याने शेतकरी शेतमजूरांची आर्थीक परिस्थीती अत्यंत बिकट असून गांवामध्ये रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे सुरु करावी व यामध्ये शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या शेतरस्त्यांची कामे प्राध्यान्याने घ्यावी तसेच एका गांवामध्ये पाच कामांची असलेली अट शिथील करण्याची मागणी करण्याचे देखील या बैठकीमध्ये ठरले आहे.
वरील मागण्यांच्या अनुषंगाने आज कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलदार मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. 
 बैठकीस उपस्थित नागरिकांनी पीक विम्यातून राष्ट्रीयकृत बँका कर्ज वसुली करत असल्याचे, दुष्काळी अनुदाना  मध्ये बागायती क्षेत्राचे अनुदान वगळणे, उस्मानाबाद व लोहारा तालुक्याचा प्रलंबीत पीक विमा, हरभरा अनुदान यासारखे विषय उपस्थित केले. या विषयांवर आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी बैठकीमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या भयावह दुष्काळी परिस्थीतीत शेतकरी, शेतमजूरांच्या न्याय मागण्याबाबत लढण्यासाठी एक आमदार म्हणून आपण खंबीरपणे सोबत असल्याचा विश्वास त्यांनी या बैठकी मध्ये व्यक्त केला.   
यावेळी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, पं. स. सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम भैय्या जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष गफार काझी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक भारत डोलारे, नाना कदम, शिवदास कांबळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, राजाराम कोळगे, व्यंकट पाटील, उध्दव पाटील, श्रीराम बापू सुर्यवंशी, गफुर शेख, ओम नाईकवाडी, आशिष नायकल, विजय हाजगुडे, अॅड शंकर आंबेकर, दिनेश पाटील, दयानंद पाटील, मिनाज पटेल, सुधीर एकंडे, चिंटू पाटील, तानाजी जमाले, तानाजी गायकवाड, दत्ता देशमुख, गोपाळ कदम,  निलेश शिंदे तसेच कळंब येथील बौठकीस पं. स. सभापती दत्तात्रय साळुंके, उपसभापती भगवान ओव्हाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडीतराव टेकाळे, विजेंद्र चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रामहारी शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल टेकाळे, जिल्हा बँकेचे संचालक विकास बारकुल, अॅड. प्रविण यादव, अनिल करंजकर, भागचंद बागरेचा, हनुमंत आवाड, शिवाजी बाराते, बाळासाहेब पवार, सतिश टेकाळे, उध्दव पवार, मदन बारकुल, प्रणव चव्हाण, पद्माकर पाटील, किरण पाटील, संभाजी वरपे, अॅड रामराजे जाधव, आबासाहेब गायकवाड, सागर मुंडे, धनंजय वाघमारे लक्ष्मण कापसे, अमजद खान, रुकसाना बागवान, रामभाऊ अंबीरकर, युवराज धाकतोडे, गणेश भोसले, अशोक चोंदे, बद्रीनाथ धुप्पाधुळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top