प्रतिनिधी |उस्मानाबाद-
शहरासाठी तातडीने विंधन विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करा, गळती थांबवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करा, यात कुचराई केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली आहे.
उजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना पालिकेच्या नियोजनाअभावी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी संपर्क साधला होता. शनिवारी आयुक्त केंद्रेकर यांनी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीसाठी केंद्रेकर यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
Top