उमरगा /प्रतिनिधी-
तालुक्यातील बोरी येथील श्री. साईबाबा ईच्छा पूर्ती मंदीराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा शुक्रवार (दि.१०) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला.
तालुक्यातील बोरी येथे उभारण्या उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा इच्छापूर्ती मंदिर वर्धापन दिन सोहळ्या निमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले करण्यात आले होते. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, प्रतिशिर्डी शिरगावचे व्यवस्थापक राकेश मुगले, मंदीर समीतीचे अध्यक्ष रवि इंगले आदीची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता महाभिषेक, नऊ वाजता साई याग, सात ते अकरा साईचरित्राचे पारायण, दुपारी बारा वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी एक ते तीन निर्जीव येथील ह भ प कैलास महाराज राजगुरू यांचे प्रवचन, चार ते साडेपाच वाजता गावातील भजनी मंडळाचा अभंग वाणी आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी सहा वाजता धुपारती व त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगा सह विविध पारंपारिक वाद्यांच्या गजरात साईबाबा पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ओम साई राम च्या जयघोषाने बोरी परिसर दुमदुमला होता. तर मिरवणूकीत पुणे प्रतिशिर्डी येथील 175 साईभक्ता सह परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. तत्पूर्वी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते पालखी पुजन करण्यात आले. सायंकाळीआठ वाजता पुणे येथील लुई ब्रेल अंध अपंग संस्थेच्या अंध व अपंग मुलांचा 'एक शाम साई के नाम' गीत संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांना 101 साईचरित्र ग्ग्रथाचे वाटप करून गाव तसेच मंदीर परिसरात एक हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प अध्यक्ष रवी इंगळे, संजय पवळे, राकेश मुळे यांनी केला. साई भंडारा वाटपाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीते साठी रवी इंगळे राकेश मुगळे संजय पवळे अनिल खंदारे अरुण बिराजदार शरद राम पाटील राम इंगळे जयपाल पाटील भरत मदने आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बोरी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.