काटी/ प्रतिनिधी -
 तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील अमतुलबी  हुसेन  शेख  वय ( 87 ) यांचे रविवार  दि. ( 5 )  रोजी  सकाळी सव्वा  अकरा  वाजता  वृध्दापकाळाने राहत्या घरी   दु:खद निधन झाले.  त्या माजी ग्रा. प. सदस्य  श्री. हारुणमियाँ शेख यांच्या मातोश्री  होत. त्यांच्या  पार्थिवावर  रविवारी  सायंकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले.    त्यांच्या  पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  
 
Top