काटी/ प्रतिनिधी-
  तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार  दि. ( 5 ) रोजी ग्रामपंचायतच्या वतीने  येथील ग्रामपंचायतचाया कार्यालयात  मराठवाडा  मुक्ती  संग्राम  लढ्यातील  शहीद काटीचे  थोर सुपुत्र हुतात्मा गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  प्रारंभी सरपंच  आदेश  कोळी  यांच्या  हस्ते विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत   हुतात्मा  गणपतराव  देशमुख  यांच्या  प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन करण्यात आले. 
         यावेळी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित  हंगरगेकर, विजयसिंह  शिवाजीराव देशमुख (बंकलगी), हितेश देशमुख, प्रदीप साळुंके,  पत्रकार  राजु भंडारी,  मकरंद  देशमुख, जितेंद्र  गुंड, बाळासाहेब  मासाळ, दत्ता सोनवणे,  धैर्यशील  गाटे, संजय साळुंके,  आदी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top