तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर त्यांच्या जागेवर काँग्रेस पक्षातील सर्वात  जेष्ट अनुभवी नेते तथा माजीमंञीआमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा काँग्रेस प्रदेश स्तरावर चर्चिली जात असल्याचे वृत्त  आहे. 
या संदर्भात काँग्रेस चे प्रभारी मल्लिकार्जृन खरगे लवकरच कांँग्रेस आमदारांची बैठक घेणर आहेत. माजी मंञी आमदार मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे चार वेळी नेतृत्व केले असुन त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष  तसेच दुग्ध विकास पशुसंवर्धन तथा मत्स्य व्यवसाय मंञी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष तसेच राज्य सहकारी बँक येथे पदावर आघाडीची सत्ता असताना  काम केले आहे. काँग्रेस पक्षातुन फुटून शरद पवारांननी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकाढला तरीही त्यानी शरद पवार बरोबर न जाता कांँग्रेस पक्षात राहुन तुळजापूर तालुका काँग्रेस  पक्षाचा बालेकिल्ला जैसे थै  ठेवला होता.  माजी मंञी आमदार मधुकर चव्हाण हे आनुभवी जेष्ट .नेते असुन त्यांचा प्रदेश काँग्रेस मध्ये मोठा दबदबा आहे.
या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल  रोजी संपणार असल्याने हे अध्यक्षपद महिन्यासाठी असणार आहे. सध्या नगर जिल्हयातील राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आ बाळासाहेब थोरात व आ मधुकर चव्हाण माजी मुखमंञी पृथ्वीराज चव्हाण माजी आ हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे,
बाळसाहेब थोरात युवा असल्याने व त्यांना आ मधुकर चव्हाण यांच्या इतका त्यांना अनुभव नसल्याने व त्यांची निवड झाली तर पक्षातील बरेच मंडळी नाराज होण्याची शक्यता असल्याने  ही नाराजी महत्वपुर्णा  असणाऱ्या आगामी  विधानसभा निवडणूक तोडावर  काँग्रेस ला परवडणारी नसल्याने तुळजापूर चे आ मधुकर चव्हाण यांच्या नावाला प्रदैश कांँग्रेस हिरवा कंदील दाखविण्याची शक्यता आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण मुखमंञी झाल्यानै ते या अल्पकाळासाठी असणाऱ्या या पदासाठी तितकेसे इछुक नसल्याचे समजते.
 
Top