प्रतिनिधी/उस्मानाबाद-
शहराला उजनी धरणातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा करताना विद्युत पुरवठा, पाइपलाइन फुटणे, यासह अनेक अडचनींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणीवर मात करुन आपण शहरातला पाणीपुरवठा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत, असे सांगून सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून शहरातील नागरिकांना लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करण्याठी कटीबध्द आहे, असे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नगराध्यक्ष निंबाळकर यंानी म्हटले आहे, उजनी पंपहाऊस येथील २ नवीन पंप कार्यन्वित करण्यात आले होते. परंतू पाण्याचा दबाव सहन न झाल्याने पंपहाऊस जवळील पाइपलाइन ८ दिवसात ३ वेळा फुटल्याने तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ लक्षात घेवून या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेतला व ६ दिवस उजनी धरणावर स्वतः मुक्काम करुन हे काम पुर्ण करुन घेतले. पाइपलाइनरील जुन्या व्हॉल्वद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने या जागी नवीन टेंपरप्रुफ वॉल्वह बसविण्याचे काम करण्यात आले. परंतू नागरिक नवीन वॉल्व्ह तोडून पाणी गळती करत आहेत. त्यासाठी नगर पालिकेने अनेकवेळा पोलिसांची मदत घेवून पाणी गळती थांबविण्याचे प्रयत्न केले आहेत. 
नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांची पत्रकातून माहिती 
 
Top