तेर/प्रतिनीधी-
पुरातन वस्तूमध्ये सामाजिक तंञाचा समावेश असतो असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.नीतीन कटेकर यानी केले.
उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय संग्रहालयात 18 मे ला जागतिक संग्रहालय दिन निमीत्ताने तेर - संस्म्रती उत्खननाव्दारे उलगडनारे तेर या छायाचिञ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी डाँ.कटेकर बोलत होते.अध्यक्षस्थानी तंञ सहाय्यक निमीता मार्कडे या होत्या तर तगर इतिहासाचे अभ्यासक रेवणसिद्धप्पा लामतुरे यांची प्रमुख उपस्थीती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमेाल गोटे यानी केले.सुञसंचलन नवनाथ पांचाळ यानी केले.यावेळी तेर येथील ग्रामसेवा संघाच्या ग्रामस्वच्छतेच्या सेवाभावी कार्याबद्दल ग्रामसंघाचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.नितीन कटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डाँ.तानाजी काटे,अँड,बालाजी भक्ते,तानाजी पिंपळे,राजेद्र माने,विलास टेळे,गोपाळ थोडसरे,केशव सलगर,केशव वाघमारे,ईर्शाद मुलानी,नागेश लोमटे,सचिन मुंडे,किसन काळे,विवेक उबाळे,अविनाश राठोड,भैरव भुसारे,विलास देशमुख,संतोष लकापते,सागर भक्ते आदी उपस्थीत होते.