लोहारा/प्रतिनिधी-लोहारा तालुक्यातील अचलेर येथील हिरमेठ संस्थान येथे प्रतिवर्षा प्रमाणे पुण्य आराधना महोत्सव सुरु झाले आहे. अंत्यत मधुर आवाजात पुराण चालु असल्याने गावातील व परिसरातील हजारो भाविक ऐकण्यासाठी येत आहेत. यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
लिंगायक श्री 1008 शिवबसव शिवाचार्य महास्वमीजी आणी लिंगायक श्री 1008 सुतरेश्वर शिवाचार्य यांच्या पुण्य आराधना कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. एम रेड्डी मलम्मा यांचे पुराण चालु असुन महास्वामीजीच्या समाधीच्यास्थळी रुद्राभिषेक कार्यक्रम घेण्यात येत आहे.
पुराणिक म्हणुन वेदमुर्ती स्वामी गवई म्हणुन श्री बसलिंगय्या स्वामी व महातेश सुतार तबला वादक म्हणुन काम पाहत आहेत. ष ब्र शिवमुर्ती शिवाचार्याच्या अर्शिवचनाने भक्तांच्या संख्येत दिवसेन दिवस वाढ होत आहे. जागरण कार्यक्रम घेण्यात येत आहे. दि. 24 मे रोजी दिक्षा आय्याचार कार्यक्रम व महास्वामीजीच्या उपस्थित अर्शिवचन होणार आहे. तर शेवटी महा प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ गावातील व परिसरातील नागरीकांनी घ्यावा, असे अवाहान अचलेर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.