कळंब/प्रतिनिधी:-
 मराठ्यांनो शिवचरित्र वाचा, ते समजून घ्या,आणि त्यांच्या विचारांचे असंख्य मावळे तयार करा. मराठ्यांच्या इतिहासातील डावपेचा पासून प्रेरणा घेवुन आख्ख जग आपले डावपेच आखतो,त्याच मराठ्यांना आज ईतिहास कशाशी खातात हेच माहिती नाही,आणि तुकोबारायांना  हेच मराठे समजून घ्यायलाही तयार नाहीत.मराठा या शब्दाला वजन प्राप्त झाले ते शिवरायामुळेच, संभाजी राजानंतर कुणाचंही नेतृत्व नसताना मराठ्यांनि तब्बल तीस वर्षे मुघलांशी झुंज दिली . महापुरुषांची जयंती ही नाचण्यासाठी ,बघण्यासाठी व घरी जावून झोपण्यासाठी नसते तर त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ठेवून तसे वागण्याची असते असे रोख-ठोक मत ईतिहास संशोधक डॉ.बालाजी जाधव यांनी कळबं केले.
     कळंब येथे मराठा सेवा संघाच्या छ. संभाजीराजे जन्मोत्सवा निमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या तिसरे पुष्प डॉ.बालाजी जाधव यांनी, “ मराठ्यांनो षंढ झालात काय” या विषयावर गुंफले . व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड होते तर विचारपीठावर प्रा.श्रीधर भवर, साखरे मामा,सलीमभाई शेख, प्रा.अरविंद खांडके, इम्रान मिर्झा,कळंब तालुका मराठी  पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, डी. जी. हौसलमल, हे उपस्थित होते.प्रतिमापूजन ,दीप प्रज्वलन व जिजाऊ वंदनेने व्याख्यान मालेला प्रारंभ झाला . 
    सद्या महापुरुषांची विचारधारा समजून घेण्याची गरज आहे, भोंदूगिरी वाढली आहे,खोटा ईतिहास सांगणाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.संतानी आश्रमात किंवा मंदिरामध्ये असण्याची गरज होती पण सद्या हीच संत मंडळी कारागृहात दिसत आहे. रंजल्या गांजल्याची सेवा करणारेच खरे संत आहेत, त्यांचीच सेवा करण्याची गरज आहे. प्रश्न विचारणाऱ्याची मुस्कटदाबी करण्याची व्यवस्था या देशात तयार होवू लागली आहे.परशुरामाचे मंदिर बांधन्या ऐवजी विठ्ठलाचे दुसरे मंदिर बांधण्याची काय गरज होती . सद्याची मंदिरे म्हणजे बडव्या लोकांची रोजगार हमी योजना असल्याचे परखड मत डॉ.बालाजी जाधव यांनी व्यक्त करून ,मराठ्यांनो आता तरी जागे व्हावा ,षंडासारखे बघत बसू नका असे अवाहन ही त्यांनी या वेळी केले.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण मोरे तर आभार संदीप शेंडगे यांनी मानले,यावेळी बालाजी चोंदे,प्रा.शिंदे सर ,अक्षय मुळीक, रहीम शेख,अमजद खान, संभाजी हारकर, संतोष मस्के यांनी पाहुण्यांचा सत्कार केला .व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी शहरातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top