उस्मानाबाद/प्रतिनिधी -
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसर व्यवस्थापनशास्त्रविभागातील सहायक प्राध्यापक विक्रम हरिशचंद्र शिंदे यांना व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच डी प्रदान करण्यात आली आहे. 
  डॉ संजय अस्वले यांच्या मार्गर्दशनाखाली त्यांनी 'महाराष्ट्रातील ग्राहकांची खरेदीसाठी ब्रँड निवड व व्यवहार' या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. गेल्या आठ  वर्षांपासून ते कार्यरत आहेत.
या यशाबद्दल प्रा विक्रम शिंदे यांचे संचालक डॉ अनार साळुंके,
 उपकुलसचिव आय आर मंझा, संजय शिंदे, विभाग संचालक डॉ सुयोग अमृतराव प्रा. सचिन बस्सैये, प्रा. वरुण कळसे आदींनी अभिनंदन  केले आहे. 
 
Top