प्रतिनिधी/ भूम-
 भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुजलाम सुफलाम योजनेअंतर्गत भूमशहरातील बानगंगा नदीचे खोलीकरण व रूंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
 यावेळी भाजपाचे न.प गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते शुभारंभ केला आहे यावेळी भारतीय जैन संघटनेचे तालुका आध्यक्ष सुनिलकुमार डुंगुरवाल, समन्वयक श्रीराम पन्हाळकर, ए.व्ही. पवार, न .प. चे नगर अभियंता गणेश जगदाळे, स्वच्छता विभागप्रमूख विठ्ठल निकाळजे, यावेळी तालुका आध्यक्ष सुनिलकुमार डुंगरवाल यांनी या योजनेअंतर्गत मौजे वालवड, गिरवली, सामनगांव, सोनेवाडी, पाथरूड, दुधोडी, जयंतनगर, आनंदवाडी , या गावात कामे केली असल्याचे सांगितले आता तालुक्यात सहा पोकलेन चालु भूम ,मानकेश्वर, दांडेगांव, मात्रेवाडी, आंद्रूड या गावात काम चालु असल्याचे डूंगरवाल यांनी सांगितले आहे.

 
Top