यात्रेनिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. गुरुवारी (दि. ९) कुस्ती स्पर्धेने यात्रेचा समारोप झाला. या कुस्ती स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह विजापुर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, बीड येथील मल्लांनी हजेरी लावली. ११ हजार रुपयाच्या अंतिम कुस्तीसाठी अक्षय शेळके (पुणे) विरुद्ध किरण गोरे (लातूर) यांच्यात लढत झाली. यात अक्षय शेळकेने बाजी मारली. स्पर्धेत यादरम्यान झालेल्या अनेक कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. स्पर्धेतील विजयी मल्लांचा यात्रा कमिटीकडून शाल, श्रीफळ, फेटा, रोख पारितोषिक व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून मोहन पणुरे, गुणवंत कारभारी, मल्लिनाथ डिग्गे, दौलाप्पा तोरकडे, भगवान निंगशेट्टी, सुभाष सारणे, आप्पाशा गोवे यांनी काम पाहिले. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी यात्रा समितीचे अध्यक्ष बसवराज कारभारी, उपाध्यक्ष बाबुराव हावळे, सचिव मल्लिनाथ डिग्गे, सदस्य महादेव मोघे, शिवशरण कारभारी, गुंडाप्पा कारभारी, सुभाष सारणे, बाळासाहेब कटारे, बालाजी निंगशेट्टी, महादेव सारणे, रोहित कारभारी, सुनील धरणे, कल्लाप्पा कारभारी आदींसह पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. |
