उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी मागणी करणाऱ्या मुलीस मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.१०) नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. बालाजी गंगणे (रा. जळकोट) याने मागील चार वर्षापासून पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तुळजापूर येथील लॉजवर, कायापूर उतमी व उस्मानाबाद येथे लंैगिक अत्याचार केला. ४ मे रोजी गंगणे याने मुलीस जळकोट येथे बोलावून घेवून मला लग्न कर म्हणशील का असे म्हणून शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच तिच्यासह वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. 
 
Top