
प्रतिनिधी/उस्मानाबाद-
परभणी जिल्ह्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा, पाथरी या शाळेत महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षिका सौ. ज्योती प्रेमनाथ डोंगरे यांच्या वर्गातील 6 विद्यार्थी श्रेया इंटेलिजंट सर्च या स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय यादीत प्रथम, व्दितीय, तृतीय आल्याबद्दल व त्यांच्या शाळेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पालक सौ. शिवशक्ती आत्मलिंग काजले, श्री नवनाथ सोनटक्के व श्री कैलास जाधव यांच्या वतीने सौ.भावनाताई अनिलराव नखाते, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद परभणी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. सुभाष चिंचाणे, शालेय समिती अध्यक्ष श्री. शिवाजी वांगीकर, उपाध्यक्ष सौ. मिराताई नाईक यांच्या हस्ते देखील सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ. ज्योती प्रेमनाथ डोंगरे या मूळच्या उस्मानाबाद तालुक्यातील पानवाडी या गावच्या रहिवाशी असून गावात व परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.