प्रतिनिधी/उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई शिवारात तीन वर्षापूर्वी झालेल्या खुन प्रकरणात आरोपीला न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजूरी व २ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
जवळगा मेसाई येथे दि.१२ एप्रिल २०१६ रोजी रात्री ९.४५ ते दि.१३ एप्रिल २०१६ च्या सकाळी ७.३३ वाजेदरम्यान भुजंग नागू वाघ याने सुधाकर मारुती वाघ यांना काठीने मारहाण करून त्यांचा खून केला.तसेच प्रभाकर सुधारक वाघ यांनाही मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. डी. जाधव यांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. याप्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्यायाधीश एस. ए.ए.आर. औटी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी तपासाअंती मांडलेला पुरावा, साक्षीदार तसेच शासकीय अभियोक्ता यांनी मांडलेली बाजू आदींची दखल घेऊन आरोपी भुजंग नागु वाघ याने गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने त्यास दि. ३० एप्रिल २०१९ रोजी न्यायाधीश औटी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
 
Top