आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन समारोहास मिळाला प्रतिसाद 
प्रतिनिधी/उस्मानाबाद-
उस्मानाबाद जिल्हयात कंपनी ने सघन आंबा लागवड हे  तंत्रज्ञानावरआधारीत आंबा लागवड हे काढणी पश्चात तंत्रज्ञानावर आधारीत आंबा लागवड ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था यांची एक साखळी निर्माण करावयाचे नियोजन केले आहे. एकाच छताखाली शेतक-यांना शेती संबंधीत सर्व सेवा जसे की, औषधे, शेती अवजारे, बि-बियाणे इत्यादी कंपनी मार्फत देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन प्रास्ताविक भाषणात कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमोल पाटोदेकर यांनी केले.
येथील उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट फार्मर्स फुड प्रो. कं.लि. आयोजित आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा उत्साह संपन्न झाला. यावेळी पाटोदेकर बोलत होते. या कार्यक्रमाची सुरूवात डॉ. पद्मसिंह पाटील माजी खासदार तथा माजी पाटबंधारे मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते दीपप्रज्वलाने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.अजितसिंह पाटील, जीवनरावजी गोरे, उस्मानाबादचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे,  जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, पं.स. सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव उपस्थित होते. यावेही एम.बी.पाटील, डॉ. रणजीत म. धेवारे, डॉ. अरूण कदम यांनी मार्गदर्शन केले.  प्रगतशील शेतकरी श्री. रेवणसिध्द लामतूरे, श्री संजय जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. जनार्धन वाघेरे प्रगतशिल आंबा उत्पादक शेतकरी नाशिक यांनी आपली यशोगाथा सांगताना सांगितले की, आंबा लागवड करून त्यांना एकरी वार्षीक ४ ते ६ लाख उत्पन्न मिळते तसेच आंबा लागवड ही काळाची गरजच आहे.  शेतक-यांनी कडधान्य पिकाऐवजी फळझाडांची लागवड करून पावसाच्या  लहरीपणावर व पाण्याच्या कमी उपलब्धतेवर मात करावी. त्यानंतर मार्गदर्शक गोविंद हांडे निवृत्त तांत्रिक सल्लागार (निर्यात) पुणे यांनी आंबा देशांतर्गत विक्री व्यवस्था व निर्यात या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठवाड्यातील केशर आंबा निर्यातीस उच्च गुणवत्ता प्राप्त आंब्याची एक जात आहे.

 
Top