उस्मानाबाद /प्रतिनिधी- येथील प्रतिष्ठीत व्यापारी शरद बाळकिसन मंत्री यांची कन्या शरयू मंत्री हिने नुकतीच अमेरिकेतील टेक्सस विद्यापीठाच्या एमएस कॉम्प्युटर सायन्स या परिक्षेत विशेष गुणवत्तेसह सुयश प्राप्त केले. शरयू मंत्री ही येथील ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर मंत्री यांची नात तर पत्रकार संजय मंत्री यांची पुतणी आहे. या सुयशाबद्दल शरयू मंत्री व शरद मंत्री यांचे बाळासाहेब
मुंदडा, पांडूरंग सारडा, प्रदीप रोहडा, अशोक मंत्री, श्रीकिशन मंत्री, मोतीचंद बेदमुथा, संतोष जाधव, प्रेमचंद बेदमुथा, चेतन भन्साळी आदींनी अभिनंदन व कौतुक केले. परदेशात अशा प्रकारे सुयश प्राप्त करणारी उस्मानाबाद येथील राजस्थानी समाजातील बहुधा ही एकमेव कन्या आहे.