प्रतिनिधी /उस्मानाबाद - जिल्हा बँकेत जमा झालेला पीक विमा तत्काळ वाटप करावा तसेच उमरगा, भूम, वाशी या तालुक्यात सोयाबिनच्या पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विमा देण्याची मागणी शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. उडीद, मूग व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम मार्च व एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कोट्यवधींची रक्कम पीकविम्याच्या नुकसान भरपाईपोटी मार्च महिन्यात जमा झालेली असून देखील मे महिना उजाडला तरी जिल्हा बँकेने अद्यापपर्यंत एक रूपयाही शेतकऱ्यांना वाटप केलेला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आळा आहे. जिल्हा बँकेने दोन दिवसात वाटप न चालू केल्यास शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी. तसेच जिल्ह्यातील उमरगा, भूम, वाशी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिला आहे. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या पीककापणी प्रयोगाच्या चुकीच्या अहवालामुळे या तीन तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिला आहे. निवेदन देतेवेळी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील,संजय निंबाळकर, डीसीसी बँकेचे संचालक संजय देशमुख, संजय पाटील दुधगावकर, सतीश सोमाणी, जगन्नाथ गवळी, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, रवी कोरे, धनंजय इंगळे, अनंत भक्ते, धनंजय वीर, दिलीप जावळे, गोविंद कोळगे, बापू ढोरमारे, सौदागर जगताप, राजनारायण कोळगे, संजय भोसले, आदींसह शिवसैनिक युवासैनिक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आदी उपस्थित होते. |