तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतु ळजाभवानी मातेचे उन्हाळ्यात सध्या दर्शन दगडी फरशी वरील तप्त उष्ण चटके सहन करीत भाविकांना घ्यावे लागत आहेत.तरी मंदीर समितीने महाध्दार समोरील दगडी फरशीवर मँट अथंरुन उष्ण चटक्या पासुन भाविकांची सुटका करण्याची मागणी ञस्त भाविकांन मधुन केली जात आहे.
सध्या महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट पसरली आहे त्यामुळे असाह्य उष्णतेपासुन सुटका मिळावी म्हणून मानव विविध उपाययोजना करीत असतो माञ माञ कोट्यावधी रुपये उत्पन्न असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदीर समिती प्रशाषणा माञ भाविकांना उन्हाळ्यात उष्णते पासुन भाविकांची सुटका व्हावी म्हणून विविध उपाययोजना करण्यासाठी तयार नसल्याचे दिसुन येते श्रीतुळजाभवानी मंदीराला पुरातण लुक मिळावे म्हणून लाखो रुपये खर्चुन तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत दगडी फरशी बसवली पण त्यावेळी उन्हाळ्यात तापुन ती भाविकांना पोळेल याचा विचार न करता बसवली.
सध्या तिर्थक्षेञ तुळजापूर चे तापमान ञेचाळीस अंशावर गेल्याने व मंदीर समोर ऐक ही वृक्ष नसल्याने येथे ऊन्हाने दगडी फरशी प्रचंड तापते सहजिकचभाविक चप्पल स्टँड मध्ये चप्पल ठैवुन अनवाणी पायी मांदीरात जातातना त्याला तापलेली दगडी फरशी प्रचंड पोळत असल्याने असाह्य उष्ण चटके सहन करीत भाविक मंदीरात जातात याचा सर्वाधिक ञास हा वृद्ध व लहान मुले व माहिला भाविकांना बसत आहे पण भाविकांच्या या गैरसोयी बाबतीत दखल घेण्यासाठी मंदीर समिती लक्ष देत नाही.
ऐखादा मंञि किंवा मोठा व्हीआयपी आला कि त्यास मँट अंथरले जाते त्यामुळै त्यांना दगडी फरशीवरिल उष्ण चटके सहन करावे लागत नाहीत देवीदारी व्हाआयपी भाविकांना ऐक वागणूक व गरीब भाविकांना दुसरी वागणूक या भेदभाव पुर्ण वागणुकी बद्दल भाविकांन मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे देवीदारी गरीब श्रीमंतांना मिळणारी भेदभाव पुर्ण वागणूकीस प्रतिबंध करण्याची मागणी देवीभक्तांन मधुन केली जात आहे.