प्रतिनिधी/ उस्मानाबाद  -
सख्ख्या मामाचा खून केल्याप्रकराी भाचा अनिल ऊर्फ लल्या बादल शिंदे यास जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी यांनी सुनावली आहे.
अनिल शिंदे (रा.मोहा पारधी पिढी, ता.कळंब) व त्याचा मामा नाना बाबू काळे (मृत) यह एक ही गाव मे शेजारी राहत होते. तीन मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता अनिलने दहा रूपयांसाठी आई दवाबाई बादल शिंदे यांच्यासोबत वाद घातला. आईने दहा रूपये दिले नाहीत, या कारणावरून अनिल आईला शिवीगाळा करीत मारहाण करीता होता. यावेळी नाना काळे हे घरात असताना त्यांना बहीण दवाबाई हिच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला.आवाज ऐकून नाना काळे भांडण सोडविण्यासाठी गेले. यावेळी अनिलने भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मामा नाना काळे यांच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर राहल भैरू पवार व बप्पा वसंत काळे यांनी धाव घेत नाना काळे यांना त्यांच्या घरी नेले. काही वेळाने अनिल शिंदे हा शिवीगाळ करीत नाना काळे यांच्या घरात घुसला. त्याने हातातील दोन गडाने नाना काळे यांना पुन्हा बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या नाना काळे यांना मोहा येथील सरकारी दवाखानयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कळंब रूग्णालयात हलविण्यात आले.मात्र, उपचार सुरू असताना नाना काळे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा, नकाशा, साक्षीदाराचे जबाब नोंदविले. तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी तपास करीत दोषारोपपत्र दाखल केले. उस्मानाबाद येथ्ील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश्या एस.ए.ए.आर औटी यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणात शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील जयंत व्ही.देशमुख यांनी कामकाज पाहिले. त्यांनी या प्रकरणात ११ साक्षीदार तपासले. जिल्हा न्यायाधीशासमोर आलेला पुरावा व सरकारी वकील अॅउ. जयंत देशमुख यांनी केलेला युक्तवाद ग्राह्या धरून अनिल शिंदे या जन्मठेप व पाच हजार रूपए दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 
 
Top