प्रतिनिधी /भूम-
| ||
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅड. पंडित ढगे हे भूम न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करतात. ते भूम येथून गावाकडे गेले होते. ते भूम रोडलगत असणाऱ्या त्यांच्या घराकडे जात असता पूर्ववैमनस्यातून त्यांच्यासह त्यांच्या भावावर कुर्हाड व काठीने जोरदार हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यात ढगे बांधव स्वतःचा बचाव करू शकले नाही. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अॅड. पंडित ढगे यांच्यावर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले. त्यांच्या डोक्यात २५ ते ३० टाके पडले असून त्यांच्या डोक्यातून रक्तप्रवाह थांबत नसल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी मारुती रामलिंग चोबे,रणजित शंकर ढगे, रेखा रणजित ढगे, महादेव बाबुराव बावळे, विठ्ठल महादेव बावळे, संदीप पांडुरंग बावळे, प्रिया संदीप बावळे, कुलदीप बावळे, निलावती महादेव बावळे, सुरेखा मारुती चोबे, पृथ्वीराज रणजित ढगे यांच्यावर रात्री उशिरा भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |