उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 शेतातील गोठ्यात १८ लाख २० हजाराचा गांजा बाळगल्याची घटना शनिवारी (दि.१८) उघडकीस आली असून रविवारी (दि.१९) अंभी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अशोक रंदवे (रा.देऊळगाव (बु) ता.परंडा) याने त्याच्या गोठ्यात स्वत:च्या फायद्यासाठी १८ लाख २० हजार रुपयांचा १८२ किलो गांजा विक्री करीता ठेवला होता. पोलिसांना याबाबत महिती मिळाल्यानंतर गांजासह एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ७ हजार रुपये असा एकूण १८ लाख २७ हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अशोक रंदवे याच्याविरुध्द गुन्हा नोंद झाला. 
 
Top