उस्मानाबाद/प्रतिनिधी-
40- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार, 23 मे 2019 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, तुळजापूर रोड येथे सकाळी 8 वाजेपासून होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी निर्गमित केले आहेत.
प्रशासकीय इमारत, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय तुळजापूर रोड या मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणीच्या कामव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश गुरुवार 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून 40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.