उमरगा-(माधव सुर्यवंशी)-
शहरातील लघु पशु चिकित्सालया तील प्रमुख व महत्त्वाची 3 पदे रिक्त असल्याने शिपाया कडून पशुधनावर उपचार केले जात असल्यामुळे हजारो पशुधन धोक्यात आली आहेत. या रिक्त पदामुळे पशु चिकित्सालया सह तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने स्मारक बनून राहिले आहेत. त्यामुळे शेतकर्याना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.  त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय व पशुधन कडे शेतकरी वर्ग वळला आहे. शासनाकडून उमरगा शहरांत लाखो रूपये खर्च करून तालुका लघु पशुचिकित्सालय ईमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील  येणेगूर, मुरूम, नाईचाकूर, मुळज व तलमोड सह श्रेणी -1 चे सहा पशुवैद्यकिय दवाखान्यात पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. दुष्काळी परिस्थितीत मात्र ही सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाची पदे रिक्त असल्याने तुटपुंजी सेवा मिळत आहे. त्याचबरोबर विविध रोगा बाबत लसीकरण आदी सेवा वेळेवर न मिळाल्याने अनेक जनावरे रोगांना बळी पडत आहेत. तालुका लघु पशुचिकित्सालयात  पशुवैद्यकिय विकास अधिकारी, सहाय्यक विकास अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ हि महत्त्वाचे तीन पदे रिक्त असल्याने या चिकित्सलया च्या कार्यक्षेत्रातील पशुधनावर येथील शिपाया कडून उपचार केले जात आहेत. तर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्या कडे याचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांची आठवड्यात एकदा फेरी असते. दरम्यान या इमारतीतच पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. पण या विभागाचीही सुविधा जनावरांना वेळेत मिळत नाही.  तर मुलज, तलमोड, नाईचाकूर, येणेगूर व मुरूम येथील श्रेणी एकच्या दवाखानातील रिक्त पदामुळे कार्यक्षेत्रात येणार््या गावातील पशुधन धोक्यात आले आहेत. त्यामुळे पशुधनावर उपचारासाठी मुख्य व अत्यंत महत्त्वाचे पदेच रिक्त असल्याने तालुका लघु पशुु चिकित्सालया सह पशुुवैद्यकिय दवाखाना  ईमारती स्मारक बनून राहिले आहेत. त्याचबरोबर लाखो रुपये कर्मचारी तसेच शाासनाचे विविध योजनां साठी लाखो खर्ची पडत असताना शेतकर्याला मात्र पशुधन वाचवण्यासाठी खासगी वैद्यकीय अधिकार्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुुर्दंड सोसावा लागत आहे.
______________________________
शहरातील तालुका लघु पशु चिकित्सालयात 5 पैकी 3 पदे तर तालुक्यातील श्रेणी एकच्या  पशुवैद्यकिय दवाखाना मधील एकुण 33 पैकी तीन पदे रिक्त असून यात पशुधन विकास अधिकारी 2 तर एक परिचर रिक्त पदाचा  समावेश आहे.
__________________________
तालुका लघु पशु चिकित्सालयाचा मुरूम येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ युवराज बिराजदार यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. तसेच रिक्त असलेल्या पदा बाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. नामदेव आघाव यानी सांगितले.
______________________________
*तालुक्यातील पशुधन संख्या!*
लहान जनावरे- 15 हजार 855
मोठी जनावरे - 52 हजार 414
शेळया मेंढया- 22 हजार 283
एकूण पशुधन- 90 हजार 552
 
Top