जिल्ह्याचे मॉनिटरींग करण्याचे कामकाज कॉमन अॅप्लिकेशन साॅफ्टवेअर (सीएएस) व रिअल टाईल मॉनिटरींगद्वारे करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथून करण्यात आला. याबाबत प्रशिक्षण दिल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तींना सरपंचांच्या हस्ते अॅन्ड्राईड मोबाईल वितरीत करण्यात आले. या स्मार्ट फोनद्वारे कुटुंबाचे सर्वेक्षण, गृहभेटी सर्वेक्षण, पोषण आहार वाटप, पूर्व प्रशिक्षण या सर्व कामकाजाचे मॉनिटरींग होणार आहे. हे प्रशिक्षण अाठ दिवसांच्या टप्प्यामध्ये होणार आहे. याचा शुभारंभ दि.१७ रोजी झाला असून दि.१४ जूनपर्यंत ते चालणार आहे. याकरीता मास्टर ट्रेनर म्हणून पर्यवेक्षीका लता अवतारे, अलका महाजन, वंदना तुपरे, सी.डी. शिंदे, कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी सी. वाय. साळुंके आदी काम पहात आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्तींना स्मार्ट फोनचे वितरण करून प्रशिक्षण सुरू करण्यात आले. |
