काटी/ प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. (18 ) रोजी सकाळी येथील भीमनगरमधील सिध्दार्थ तरुण मित्र मंडळाच्यावतीने जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या 2563 वी जयंती तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करीत मानवंदना देऊन मोठ्या उत्साहात साजरी केली. शनिवारी सकाळी दहा येथील भीमनगरमधील बुध्द विहारात दलित मित्र तथा पत्रकार नंदु बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तर शनिवारी सायंकाळी व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दलित मित्र नंदु बनसोडे यांनी तरुणांना मार्गदर्शन करून व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, अमर बनसोडे, माजी सरपंच अशोक बनसोडे , मंडळाचे अध्यक्ष दशरथ बनसोडे, अरुण घोंगडे, जितेंद्र बनसोडे भोलेनाथ बनसोडे, दयानंद डोळसे, विशाल मस्के, बाळू क्षिरसागर, ताई सुरते यांच्यासह आदीजण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
