तुळजापूर/प्रतितिनधी-
दुष्काळाची भीषणता पाहता पाऊस लांबला तरीही समाधानकारक पाऊस पडे पर्यत दुष्काळ निवारणार्थ योजना चालुच राहतील दुष्काळात जनतेच्या पाठीशी सरकार ताकदीनिशी जनतेच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे महसुल मंञी चंद्रकांत पाटील यांनी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर पञकारांशी बोलताना दिली.
राज्याचे महसुल मंञी शनिवार (दि11) श्री तुळजाभवानी चे दर्शन घेतले त्यानंतर पञकारांशी दुष्काळ वर बोलताना म्हणाले की, यापुर्वीचे सरकार मार्च एप्रील मध्ये दुष्काळ आहे की नाही हे पाहण्यासाठी केंद्राचे पथक येत असे व एप्रील मध्ये दुष्काळ जाहीर करत असे पण आमच्या काळात आम्हाला ऑक्टोबर मध्ये अंदाज आल्याने आम्ही 30 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. केंद्राच्या निकषाप्रमाणे 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केंद्राने केला असे सांगुन विरोधकावर अप्रत्यक्ष टिका केली
दुष्काळ निवारणासाठी 151 तालुक्यातील अठ्ठावीस हजार गावांनसाठी केंद्राने 4700 कोटी रुपये निधी मंजूर केले त्यानंतर अनेक तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. या सर्व गावातील दुष्काळ निवारणार्थ येणारा खर्च राज्याचा तिजोरीतुन करणायात येणार असल्याचे यावेळी म्हणाले. राज्यात पाचहजार गावे व आठ हजार वाड्या मध्ये पाच हजार टँकरने पाणीपुरवठा केला जात असुनपाच लाख लोकांना रोजगार दिला असुन आणखी पाच लाख लोकांना रोजगार देण्याचे नियोजन आहे. राज्यात तेराशे पशु छावण्या सुरू असुन यात साडेआठ लाख जनावरे असल्याचे स्पष्ट केले.राज्यातील ६७ लाख शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पोटी पाच हजार कोटी रक्कम पोहचली असुन राज्यातील शेतक-यांना 32 हजार कोटी कोटी रुपये विमा दिला असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी नितीन काळे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, सत्यवान सुरवसे, नागेश नाईक, श्रीकांत कदम, गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोदले, विकास मलबा, सचिन अमृतराव, बाळासाहेब शामराज, सागर कदम, सुहास सांळुके, गिरीश देवळालकर आदींची उपस्थिती होती..