उस्मानाबाद./प्रतिनिधी-
जिल्हयात दि.28 मे ते 9 जुन 2019 या कालावधीत अतिसार मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमे 05 वर्ष वयोगटातील बालकांना अतिसार प्रतिबंधात्मक ओ आर एस व झिंक गोळया देण्यात येणार आहेत. या मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणु समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. संजय कोलते, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेली यावेळी . डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. आर. व्ही. गलांडे जिल्हा शल्यचिकीत्सक उस्मानाबाद उपस्थित होते.
तसेच सन 2015 पासुन राज्यात घेण्यात येणा-या अतिसार नियंत्रण पंधरवडाच्या यशस्वी प्रयत्नानंतर यावर्षाही अतिसारामुळे होणारे बालमृत्यु शुन्य करणे उदिष्ट समोर ठेवून दि. 28 मे ते 9 जून 2019 या कालावधीत ही योजना राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान 0 ते 5 वयोगटातील बालकांना ओ. आर. एस व झिंक या गोळयांचे वाटप घरोघरी आशा स्वयंसेविकेमार्फत वाटप करण्यात घेणार असुन अतिसार झालेल्या बालकांना आरोग्य संस्थेमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडी शाळेमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षीके करुन दाखविण्यात येणार आहे.
यामुळे बालमृत्यु मुक्ती करण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत 05 वर्षापर्यंत ग्रामीण भागात 1,31,353 व शहरी भागात 46139 अशी एकूण 1,77,492 बालके असुन त्यासाठी अशा स्वयंसेविका 1198 ,आरोग्य कर्मचारी 482, आरोग्य पर्यवेक्षक 232 अंगणवाडी कार्यकर्ती 1804 व अंगणवाडी मदतनीस 1765 असे 5881 मनुष्यबळ लागणार आहे.
तरी या अतिसार नियंत्रण मोहिमेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मा.जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी, एच. व्ही. वडगावे ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आ. व्ही. गलांडे जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांनी केले आहे.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. निपानीकर, महिला बालविकास, डॉ. वाघमारे, स्त्री रुग्णालय. एम. आर. पांचाळ जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. खडके, , सहा. संचालक (कुष्ठरोग ), डॉ. खुने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. किरण गरड, जिल्हा लेखा व्यवस्थापक, श्री जिवन कुलकर्णी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हास्तरीय श्री. अर्जुन लाकाळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.