उस्मानाबाद/प्रतिनिधी- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद या समितीकडून दिनांक:- 20 मार्च 2019 ते 15 जून 2019 या कालावधीत कार्यालयीन दिवशी (शासकीय सुट्टी सोडून ) विशेष मोहिमेद्वारे शैक्षणिक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.अर्जदारांच्या प्रकरणांवर समितीला लवकर निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी नियम 2012मधील नियम क्र.17 (2)(3) नुसार कागदोपत्री पुरावे,शपथपत्र इतर आवश्यक दस्ताऐवज अद्याप दाखल केले नसल्यास व अर्जदारांनी तातडीने समितीकडे त्रुटीची पुर्तता करावी.
          शैक्षणिक वर्ष सन 2018-19 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान या शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधीत महाविद्यालयामार्फत पडताळणी समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.मात्र ज्यांना समितीकडून त्रुटी कळविलेली आहे.अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 21 मे 2019 रोजी कार्यालयात येवून त्रुटींची पुर्तता करावी असे आवाहन उपयुक्त तथा सदस्य,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,उस्मानाबाद यांनी केले आहे.
  तसेच अर्जदार यांना वारंवार संपर्क करुनही जे अर्जदार प्रकरणांच्या त्रुटीची पुर्तता करणार नाहीत.त्यांचे अर्ज उक्त नमूद नियमानुसार निकाली काढण्यात येतील याची नोंद घ्यावी.
    अर्जदारांनी स्वत:अथवा त्यांचे आई,वडील,भाऊ-बहीण यांनीच कार्यालयाशी संपर्क साधावा.त्यांचे व्यतिरिक्त इतर कोणीही संपर्क साधू नये. असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव ,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,उस्मानाबाद यांनी कळविले आहे
 
Top