प्रतिनिधी/उस्मानाबाद-
उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी योजनेच्या जलवाहिनीवर टेंम्परप्रुफ व्हॉल्व बसविण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होऊन शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
संपूर्ण उजनी जलवाहिनीवर एकूण १३० व्हॉल्व बसविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम ज्या ठिकाणी गळती आहे अशा ठिकाणी सदरचे टेम्परप्रुफ व्हॉल्व बसविले जात अाहेत. काही ठिकाणी तेथील नागरिकांकडून नवीन व्हॉल्व बसविण्यास अडथळे निर्माण हाेत आहेत. परंतु, येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली जात असल्याची माहितीही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
|