नळदुर्ग/प्रतिनिधी:-
येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक जगदाळे यांनी रामतीर्थ, नळदुर्ग येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या गोवंश चारा छावणीस भेट देऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी श्री जगदाळे म्हणाले की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत भारतीय गोवंशासाठी संस्थेने चालू केलेल्या या विनाअनुदानित चारा छावणीत सर्व पशूंची चारा,पाणी, आरोग्य शिबीर या माध्यमातून उत्तम संगोपन होत असून,संस्थेने गोवंश सांभाळण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात माझ्यासह सर्व गो प्रेमी भक्कमपनेसोबत असतील असे मनोगत व्यक्त केले.
 याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री नितीन कासार उपस्थित होते. 
सदरील चारा छावणीस गेल्या दहा वर्षांपासून पूर्ण वेळ देऊन गोवंश सांभाळून विषमुक्त शेती करण्याची जागृती करणारे उमरगा येथील श्री जयंत पाटील तसेच नळदुर्गचे नगरसेवक श्री महालिंग स्वामी,लोकमंगल समूहाचे विश्वस्त श्री आनंद लाटे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड, एकलव्य आश्रम शाळेतील शिक्षक श्री अनील घुगे यांनीही भेट दिली...
 
Top