प्रतिनिधी / उस्मानाबाद 
तालुक्यातील तुगाव येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारीत चार महिलांसह ११ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) रात्री ७.३० वाजेदरम्यान घडली.
तुंगाव येथील गट नंबर ५९ मधील जमिनीच्या पिकाच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याबाबत श्रीकृष्ण देविदास भुत्तेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश उर्फ रामेश्वर भुतेकर, बळीराम भुतेकर, आप्पा भुतेकर, तानाजी भुतेकर, धनाजी भुतेकर, दत्तात्रेय भुतेकर, नेताजी भुतेकर, सुलभा भुतेकर, संगीता भुतेकर, मनीषा भुतेकर, नयना भुतेकर, संगीता बळीराम भुतेकर, सारिका भुतेकर , श्रीमंत भुतेकर, गणेश भुतेकर या १५ जणांविरुद्ध कोयत्याने व काठीने मारहाण करून नंदकुमार भुतेकर व श्रीकृष्ण भुतेकर यांना जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. तर याच प्रकरणात बळीराम श्रीमंत भुतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदकुमार भुतेकर, श्रीकृष्ण भुतेकर, आत्माराम भुतेकर, पोपट भुतेकर, अमर भुतेकर, उमाकांत भुतेकर,अण्णा भुतेकर, दयानंद भुतेकर, टिंकू भुतेकर, दत्तात्रेय भुतेकर, आप्पा भुतेकर व इतर दोन जण अशा १३ जणांविरोधात घरावर दगडफेक करून काठी व सायकलच्या चैनने मारहाण करून बळीराम भुतेकर, रामेश्वर भुतेकर, तानाजी भुतेकर,उत्तरेश्वर भुतेकर, नेताजी भुतेकर, संगीता भुतेकर, काशीबाई भुतेकर ,मनीषा भुतेकर, नयना भुतेकर यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने रात्री खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर, पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.जी. वेव्हळ यांनी भेट दिली. 
 
Top