प्रतिनिधी | भूम
|
तालुक्यातील पाथरुड- खर्डा रोडवर सावरगावजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात राळेसांगवी (ता.भूम) येथे रविवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. राळेसांगवी येथील विजय रामदास टाळके (२५) हा तरुण दुचाकीवरून (एमएच १७ बी बी ४७६१) गावाकडून खर्डाकडे निघाला होता. यावेळी सावरगावजवळ खर्डाकडून येणाऱ्या कारने (एमएच २३ एएस १३७५) समोरून जोराची धडक दिली. यामध्ये विजय टाळकेचा जागीच मृत्यू झाला. |