उस्मानाबाद /प्रतिनिधी
 दारूमध्ये विष पाजून गळफास दिला व ठार मारले. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे ५ तेे ६ एप्रिलदरम्यान ही घटना घडली.
लोहगाव येथे शिवाजी भैरु डबडे (रा. लोहगाव) यांच्या सांगण्यावरुन नेताजी ज्योतीबा डबडे, महादेव उर्फ अण्णा वैजिनाथ मारेकर (दोघे रा.लोहगाव) यांनी डिगंबर उर्फ डिगू शिवाजी डबडे (रा.लोहगाव) यास त्याच्या घरातून दुचाकीवरून घेतले. रस्त्यात कालीदास उर्फ पप्पु बलभीम जाधव (रा.लोहगाव) यास सोबत घेऊन डिगंबर डबडे यास दारुमध्ये विष पाजले. त्यानंतर गळफास देऊन ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला. याप्ररकणी शिवानंद संद्धराम पाटील (रा. लोहगाव, तुळजापूर) यांच्या फिर्याजीवरुन चार आरोपींविरुद्ध शनिवारी (दि.६) नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
Top