लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हिंदु, मुस्लीम समाजाचे एकतेचे प्रतिक ख्वॉजा जैनुद्दीन उर्फ जिंदावली यांच्या उर्सास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या दर्ग्यास दर्शनासाठी महाराष्ट, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अशा विविध राज्यातील हिंदु मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात येतात. या तिन दिवस चालणाऱ्या उर्सात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याठीकाणी व्यापाऱ्यांनी विविध प्रकारची दुकाने व स्टॉल मोठ्या प्रमाणात लावली आहेत.
   लोहारा शहरातील इब्राईम सिद्दीकी यांच्या घरातुन प्रसाद तयार करुन सालाबाद प्रमाणे  संदल कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयातुन दि.10 एफ्रिल रोजी तहसीलदार विजय अवधाने यांच्या डोक्यावर संदल देवुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. या संदलची मिरवणुक आझाद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे काढण्यात आली. यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. हा संदल मार्डी येथील दर्ग्यात रात्री उशिरा चढविण्यात आले.
यावेळी धर्मगुरु आबुलसाहेब कादरी, नागण्णा वकील, चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, किशोर साठे, दयानंद गिरी, आयुब हबीब शेख, अविनाश माळी, विक्रांत संगशेट्टी, के.डी. पाटील, दिपक रोडगे, अशोक शिंदे, भागवत गायकवाड, इब्राहिम सिद्दिकी, अभिमान खराडे, आझीम सिद्दीकी, रफिक शेख, संदल कमिटी अध्यक्ष बाबा सुंबेकर, कुर्बान खुटेपड, रफिक सिद्दीकी, शफिक सिद्दीकी, हारुण सिद्दीकी, गौस सिद्दीकी, पत्रकार बालाजी बिराजदार, गिरीश भगत, इकबाल मुल्ला, महेबुब फकीर,
यांच्यासह हिंदु व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व तसेच हैद्राबादचे धर्मगुरु डॉ.आशमुतल्लाह शहा हुसेनी यांच्यावतीनेही संदल चढविण्यात आले.  दि.11 एफ्रिल रोजी सांयकाळी लोहारा शहरातील आझाद चौक येथुन भव्य चादर मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. हि चादर मिरवणुक आझाद चौक मार्गे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे काढुन रात्री दर्ग्यात चादर चढविण्यात आली. व मार्डी येथील दर्ग्यात दि.11 एफ्रिल रोजी रात्री जिरागाचा व जंग्गी कव्वालीचा मुकाबला कार्यक्रम घेण्यात आला. व दि.12 एफ्रिल रोजी सकाळी जियाराताचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास हिंदु व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
 
Top