तुळजापुर /प्रतिनिधी-
मंगळवार दिनांक 09 एप्रिल 2019 पासून विश्व हिंदू परिषद धाराशिवच्या वतीने तुळजाभवानी मंदिर परिसर तुळजापूर येथे प्रसाद वाटप कार्याचा शुभारंभ करण्यात आला. आदरणीय महंत ईच्छागिरी महाराज व महंत अरण्यगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या सेवा कार्याचा प्रारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद धाराशिव यांच्या वतीने दर मंगळवारी तुळजाभवानी मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन विंहिंपच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके, विहिंप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौरे, तुळजापूर येथील प्रतिष्ठित नागरिक व विहिंपचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री शाहुराज कवठेकर अप्पा विंहिंप मातृशक्तीच्या प्रभावती मार्डीकर, छाया लोंढे, सौ धर्माधिकारी, सेवा विभागाचे मनोज कदम, रोहित संदले, तुळजापूर बजरंग दलाचे विकी वाघमारे, तुळजापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री संजयकुमार बोंदर, धाराशिव येथील श्री राजपूत यांच्यासह तुळजापूर येथील नागरिकांची उपस्थिती होती
 
Top