उस्मानाबाद,/प्रतिनिधी
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसर  येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त इतिहास संशोधक, अभ्यासक ऍड राज कुलकर्णी यांचे व्याख्यान येत्या रविवारी (दि. १४) आयोजित करण्यात आले आहे . 
 संचालक प्राचार्य डॉ अनार साळुंके अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मुख्य सभागृहात सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी ऍड कुलकर्णी हे 'डॉ बाबासाहेब आंबेडकर व समकालीन भारत ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास उपकुलसचिव विद्यार्थी कल्याण समन्वयक डॉ. महेश्वर कळलावे, संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
 
Top