तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विकास नागनाथ पाटील वय (37 ) यांचे विजापूर येथे अपघाती निधन झाले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, वाणेवाडी (ता. तुळजापूर ) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विकास नागनाथ पाटील हे मागील अनेक वर्षापासून विविध हाॅस्पिटल सारख्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम करीत होते. शनिवार दि. ( 6 ) रोजी दुपारी दोन वाजनेच्या सुमारास विजापूर (कर्नाटक ) येथील एका खासगी हाॅस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील पाण्याची टाकी स्वच्छता करुन खाली उतरताना चौथ्या मजल्यावरुन पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता वाणेवाडी (ता. तुळजापूर ) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.