उमरगा( माधव सुर्यवंशी)
तालुक्यातील
पेठ सांगवी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचे चटके सहन करत पाण्यासाठी तीन चार किलोमीटर वणवण भटकत घागरभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेे आहे. तर उन्हाचे चटके बसून आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहेे.
तालुक्यातील पेठसांगवी गावचे 1993 च्या भुकंपानंतर वाडी, माळ या तीन भागात पुनर्वसन झालेल्या गावात सन 1998 साली 22 खेडी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. या योजना निकामी झाल्याने नागरिकांना बावीस महिने देखिल पाणी मिळाले नाही. तर ग्रामपंचायती ने राष्ट्रीय पेयजल योजने साठी वारंवार पाठपुरावा केल्याने शासनाने यासाठी 97 लाख रूपयाची मंजुरी देण्यात आली होती. परंतु सरकार कडून ऐनवेळी स्थगिती देण्यात आली. एक हजार पन्नास कुटूंबातील पाच हजार लोकसंख्या तर तीन हजाराच्या जवलपास दुभती लहान मोठे जनावरे आहेत. तर गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर, तीन विंधन विहीरीसह सह सहा हातपंपानी पाण्या अभावी गेल्या तीन महिन्यापूर्वीच दम तोडला आहे. सध्याच्या स्थितीला अधिगृहन केलेल्या 6 विंधन विहीरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या सर्व विंधन विहिरी गावा पासून दोन ते तीन किलोमिटर लांब असल्याने नागरिकांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वीज भारनियमना मुळे उन्हाचे चटके व रात्रंदिवस जागरण करीत वीजपुरवठा सुरू होण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. टॅंकर ने पाणीपुरवठ्या साठी महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढला होता. त्यानंतर ग्रामपंचायती ने फेब्रुवारी व मार्च मध्ये दोन वेळा पंचायत समिती व तहसीलदारा कडे टॅंकरची मागणी केल्यावर अटी व निकषाचे कारण पुढे करून याकडे दुर्लक्ष करीत प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. सर्वात आश्चर्य म्हणजेे सन 2015 च्या दुष्काळात 11अधिगृहन व तीन टॅंकर द्वारे शासनाने गावाला पाणीपुरवठा करून तहान भागवली होती. यावेळेसच अटी व निकष कसे काय आले असा संतप्त सवाल करीत टॅंकरने गावात पाणी उपलब्ध करुन देेेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
 
Top