* एकाची प्रकृती गंभीर
* तलमोडचे ग्रामस्थ आक्रमक
* पोलिसिवर जमावाचा हल्ला
उमरगा/प्रतिनिधी :
उमरगा नजीक तलमोड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कारचे टायर फुटल्याने गाडीने तीन पलटया खाऊन पुलावरुन खाली पडुन गाडीने पेट घेतला. यावेळी दोघांचा जागेवर जळून मृत्यू झाला तर दोन जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात दुपारी चारच्या दरम्यान घडली. यावेळी संतप्त जमावाने पोलिसावर हल्ला करीत उशीरा आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला धक्का देत खड्डयात ढकलून दिले.
याबाबत माहिती अशी की, अमोल जोमदे हा तलमोड येथील भाचा असुन तो पुणे येथे राहतो. त्यांच्या गाडीत बसून इतर तिघेजण दुपारी चारच्या दरम्यान उमरग्याहुन तलमोडकडे जात होते. यावेळी गाडीचे टायर फुटल्याने गाडीने दोन तीन पलटया खाऊन पुलावरुन खाली पडली व अचानक पेट घेतला. यामध्ये ऋषीकेश मोरे वय २२ वर्ष रा. तलमोड व अमोल जोमदे वय २३ वर्ष रा. भुयार चिंचोली या दोघांचा गाडीतच भाजुन मृत्यू झाला आहे. तर संस्कार तळभोगे वय १० वर्ष रा तलमोड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातुरला पाठवण्यात आले असताना.लातुर. येथील रुग्णालयात. रविवारी रात्री निधन झाले तर प्रदिप मुंगळे वय १९ वर्ष रा. तलमोड हे जखमी झाले असून उमरगा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात घडल्यावर पोलिस काही वेळात घटनास्थळी हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही म्हणत, संतप्त जमावाने पोलिसावरच हल्ला चढवला. व उशीरा आलेल्या उमरगा अग्निशमन दलाच्या गाडीला धक्क देत नाल्यात ढकलून दिले. परिणामी पेट घेतलेले वाहन विजविता आले नाही. पोलिसांनी जादा कुमक मागवुन जमावास घटनास्थळपासून दुर केले. तदनंतर मुरुम येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग विझवण्यात आली. जळालेले मृतदेह गाडीतच अडकून होते. सायंकाळी सात वाजता क्रेनच्या सहाय्याने जळालेली गाडी वर काढुन त्यातील मृत व्यक्तींचे पोस्टमार्टम करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी हजर होते.