नळदुर्ग :/प्रतिनिधी-
 कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने तामलवाडी ता. तुळजापूर येथे आयोजित केलेल्या सामुदायीक विवाह सोहळयात एकूण दहा जोडप्यांचा विवाह मोठया थाटामाटात पार पडला. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अशोक जगदाळे त्यांच्या पत्नी सौ. अशाताई जगदाळे व नळदुर्गच्या नगराध्क्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांनी सर्वच वधुंचे कन्यादान केले. 
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अशोक जगदाळे यांच्या कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने तामलवाडी ता. तुळजापूर येथे सलग तिसऱ्या वर्षी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या विवाह सोहळयास नव दाम्पत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या विवाह सोहळयात एकूण दहा जोडप्यांचा विवाह अशोक जगदाळे त्यांच्या पत्नी सौ. अशाताई जगदाळे व नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर सर्वच वधु वरांना अशिर्वाद देण्यासाठी संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर हे उपस्थीत होते. तर यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, उत्तमराव लोमटे, विजयकुमार सरडे, पांगदरवाडीचे माजी सरपंच बालाजी डोंगरे, सरंपच विजय निंबाळकर, गंजेवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर गंजे, पिंपळा बु. चे विकास संस्थेचे अध्यक्ष नागनाथराव कदम, आपसिंगा पंचायत समीतीचे सदस्य शरद जमदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सज्जन पारधे, बारुळ चे सुभाष पाटील, तामलवाडी तंटामुक्त समीती अध्यक्ष शिवदास पाटील, तामलवाडी वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष भाउसाहेब पाटील, सांगवी काटीचे सरपंच नागेश मगर, काटगावचे माजी सरपंच निवृत्तीराव माळी, युसुफ मुलानी, मैनोददीन पटेल, खंडू पावले, पंचायत समीती सदस्य दत्तात्रेय शिंदे, सुरतगावचे सरपंच विजय व्हटकर, पंचायत समीती सदस्य शिवाजीराव गोरे, काक्रंबा सरपंच अनिल बंडगर, माजी पंचायत समीती सदस्य अच्यूत वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समीती तुळजापूरचे संचालक यशवंत लोंढे, सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरंपच दत्ता वडणे, बसवणप्पा मसुदे, शहाजी लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुशमा लोंढे, नळदुर्गचे नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, शरद बागल आदीसह तामलवाडी व परिसरातील गावचे सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.
या विवाह सोहळयात विशाल गणपती कोळी व ममता संजय देवगड, चेतन गुंडीबा मोटे व सोनाली शरद देवकते, बाळासाहेब जालीदर गायकवाड व अश्वीनी खंडू कांबळे, सुनिल दत्तात्रेय सगर व सोनम तानाजी सगर, अजय शिवाजी जगताप व निकीता दादाराव आगुडे, आकाश सुरेश शिंदे व लक्ष्मी लक्ष्मण चव्हाण, राहूल रामा देवकर व रुपाली रामचंद्र पवार, शत्रुघ्न जांबूवंत क्षिरसागर व चैताली नागनाथ माळी, सोमनाथ रामा देडे व काजल श्रीकांत रणदिवे, अर्जून दिलीप चौधरी व लक्ष्मी वैजीनाथ श्रींमजले आदी जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करीत आसताना अशोक जगदाळे म्हणाले की, प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे, दरम्यान या विवाह सोहळयाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेच्या मुला मुलींचे विवाह पार पडत आसल्याने समाधान वाटत आहे, या शिवाय भविष्यात या सामुदायीक विवाह सोहळयाचे आणखिन मोठया प्रमाणात आयोजन करण्याचा मानस असुन जास्तीत जास्त गोर गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या मुला मुलींचे विवाह लावून देण्याचा प्रयत्न आपण करणार आसल्याचे ते म्हणाले. यावेळी ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर यांनी ही नव जोडप्यांना अशिर्वचन दिले. तर यावेळी आप्पासाहेब पाटील, दत्तात्रेय शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. विवाह सोहळयाचे सुत्रसंचालन विठठल नरवडे यांनी केले. यावेळी सामुदायीक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी यशवंत लोंढे व त्यांचे मित्र परिवार त्याच बरोबर नवल जाधव, महेश जळकोटे, यशवंत राठोड, राजकुमार पाटील, बबलू जगदाळे, बाळासाहेब सुर्यवंशी, रोहीत ठाकर, सचिन भोई, सुजित बिराजदार, रोहीत बागल आदींनी परिश्रम घेतले.
 
Top