उस्मानाबाद,/प्रतिनिधीक्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद व्दारे आयोजित विविध प्रकारच्या एकुण 10 खेळांच्या  विनामुल्य क्रीडा प्रशिक्षण शिबीर हे दि. 15 एप्रिल 2019 पासून रोज सकाळी व सध्याकाळी 14/17/19 वयोगटातील मुले व मुलींचे क्रीडा  प्रशिक्षण शिबीरे सुरु आहे.
सदरील शिबीरात उस्मानाबाद जिल्हयातील व तालुक्यातील विविध ठिकाणातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी/खेळाडुंनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. त्यांना  तज्ञ क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी तसेच राज्य  क्रीडा मार्गदर्शक कडून तात्रिक व तंत्रशुदध पध्दतीने खेळाचे मार्गदर्शन देण्यात येत आहे. याशिबीराचा फायदा येत्या शैक्षणिक वर्षात होणा-या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धेकरिता याचा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. फुटबॉल, हॉकी , कुस्ती,आर्चरी, मैदानी जिल्हा स्टेडियम येथे सुरु असून 200 खेळाडूंनी यात सहभाग नोंदवलला असून उर्वरित ठिकाणी खो-खो, जयप्रकाश विद्यालय रुईभर येथे सुरु असून तुळजापूर येथे सैनिकी शाळेत मैदानी, सॉफ्टबॉल, फुटबॉल या खेळाचे प्रशिक्षण सुरु आहे. सर्व उस्मानाबाद जिल्हयातील खेळाडूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री संजय महाडिक यांनी केले आहे.
 
Top