प्रतिनिधी/तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचा मंदीराच्या मुख्यगर्भगृहावरील शिखरावर सुर्यादयापुर्वी देवीचे मंहत  तुकोजीबुवांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली तर मंहत वाकोजीबुवांचा हस्ते विधीवत पुजन करण्यात आले. ही गुढी देवीच्या आबदागिरीवर उभारण्यात आली. आज देविस संपूर्ण सुवर्ण अलंकार म्हणजे एक नंबर अलंकार डबा घालण्यात आला होता व साखर हार घालण्यात आला. तर होळी दिवशी न काढलेल देवीचा छबिना गुढीपाडव्या दिनी राञी काढला.. धार्मिक लोकांनी नववर्षाचा प्रथम दिनी  देवीदर्शन घेण्यासाठी मोठ्या संखेने गर्दी केली होती.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्ताच्या पार्श्वभूमीवर मंदीरात मोठ्या प्रमाणात लहान बालकांचे जावळ काढण्यात आले.तसेच शहरात अनेक दुकांनाचे शुभारंभ झाले. शहरात बहुंतांशी घरावर गुढ्या ऐवजी भगवे झेंडे उभारण्यात आले होते.
 
Top