
प्रतिनिधी/लोहारा
दरवर्षी प्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमोहर्तावर लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे जि.प.शाळेच्यावतीने कल्लेश्वर पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्यामध्ये जि.प.प्रा.शाळा तोरंबा या शाळेने सहभाग घेतला. यावेळी व्यसनमुक्ती, स्वच्छता, बेटी बचाव, वृक्षारोपन व मतदान जागृती असे विविध फलक दर्शवून जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावेळी शाळेचे विद्यार्थी वारकरी वेशभुषेतुन आम्ही शिक्षणाचे वारकरी असा संदेश देताना दिसत होते. गावातील नागरीकांनी चिमुकल्या वारकऱ्यांना भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत चांभारगे,
सहशिक्षक राऊतराव सर, गावातील नागरीक, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.