प्रतिनिधी /तुळजापूर
मोकाट जनावरांचा हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ०५) सकाळी जिजामाता नगर भागात घडली. गंभीर जखमी महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
शकुंतला दामोदर भस्मे (६५, रा. जिजामातानगर) यांच्यावर मोकाट जनावराने हल्ला केला. यामध्ये पोटात शिंग घुसल्याने गंभीर जखमी भस्मे यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेनंतर संतापलेल्या शहरवासीयांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जखमी महिला भस्मे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले, पांडुरंग साबणे, अर्जून भस्मे, इक्बाल शेख, नवनाथ पलंगे, रणजित सूर्यवंशी आदींचा स्वाक्षरी आहेत. शहरात शेकडोच्या संख्येने मोकाट जनावरे मुक्त पणे वावरत आहेत. महाद्वारपरिसरासह शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. मोकाट जनावरांचा बंदोबस्तकरण्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. 
 
Top