उस्मानाबाद /प्रतिनिधी)-
देशातील पिचलेल्या,दुर्लक्षित राहिलेल्या दीन,दलित ,गोर गरिब व ज्यांना अस्पृश्य म्हणून गावकुसाबाहेर ठेवलेल्या समाजात जागृती करून त्यांना स्वाभिमान,सन्मान ,माणूसपन देण्याचे काम ख—या अर्थाने म.ज्योतीबा फुले,छञपती शाहू महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले त्यामुळेच परिस्थितीने गांजलेल्या कोट्यावधी ,समाज बांधवांना न्याय मिळाला आहे.म.फुले यांनी पुण्यात अस्पृश्यांना घरातील पाण्याचा हौद खुला केला व पहिली मुलींची शाळा काढून गोर ,गरिब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.तर छञपती शाहू महाराज यांनी दीन, दलितांना प्रवाहात आणन्यासाठी १९०२ला ,आपल्या संस्थानात मागासवर्गीय समाजाला पन्नास टक्के आरक्षण दिले.तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातुन कोट्यावधी मागास समुळाला न्याय दिल्यानेच आज गरिब समाजाची प्रगती झाली आहे.असे प्रतिपादन प्रा.राजा जगताप यांनी ११एप्रिल "म.फुले जयंती" व "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंती निमित्ताने" कुरणे नगर,झेंडे नगर उस्मानाबाद येथील "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने"आयोजित केलेल्या व्याख्यानात केले आहे.
प्रारंभी प्रमुख पाहुणे प्रा.राजा जगताप यांनी म.फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले .यावेळी अध्यक्षस्थानी अॅड.भारती रोकडे होत्या.
पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की,डाॅ.बाबासाहेबांची जयंती साजरी करतांना आपण बाबासाहेबांचे त्यागीमय जीवन व त्यांनी खडतर प्रवासातून परदेशात जाऊन घेतलेले शिक्षण व शिक्षणातून त्यांनी केलेली सामाजिक ,राजकीय,धार्मिक,कक्रांती डोळ्याआड करून चालणार नाही.ज्या बाबासाहेबांनी समाजासाठी भरभरून दिले आहे.त्यामुळेच आपली प्रगती झाली आहे.परंतु आजही समाजाची आवस्था खूपच वाईट आहे.जे शिकले .जे नोकरीला लागले त्यांनी समाजाचे रूण फेडण्यासाठी समाजातील गोर,गरिब मुलांना योग्य मागर्गदर्शन करूण तरूणातील नैराश्य काढण्याचे काम केले पाहिजे व समाजातील दिशाहिन झालेल्या तरूणांना प्रवाहात आणले पाहिजे यासाठी आपण वेळ देणे गरजेचे आहे.तरच तरच बाबासाहेबांची खरी जयंती साजरी केली आहे असे वाटेल.आपल्या उन्नतीसाठी व देशाच्या हितासाठी आजही फुले ,शाहू,आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही.ही विचारधारा रूजवण्यासाठी आपण पुढे यावे असे त्यांनी शेवटी आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.रत्नाकर मस्के यांनी केले.सूञसंचालन आकाश वाघमारे यांनी केले. यावेळी राऊत सर, ऍड. भरती रोकडे, संजय दणाने, श्री.प्रमोद झेंडे, देविदास हावळे, नितीन माने, लालासाहेब डावकारे, अनिकेत झेंडे, आदी उपस्तीत होते