भूम /प्रतिनिधी-
:-अफजल खान म्हणून अमित शाह ला संबोधित करणारे आज गळा भेट करून अमित शाह चा उमेदवारी अर्जे भरण्याची वेळ का आली .बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना सत्तेसाठी इतकी लाचार कशी झाली. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नसून ही चिवसेना बनली आहे . शिवसेनेचे चिन्ह वाघ काढून चिमणी चा फोटो लावावा अशी घणाघात टीका शिवसेना वरती मा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भूम येथिल प्रचार सभेत केला
 पुढे म्हणाले की हि प्रचाराची नसून विजयाची आहे. मराठवाड्यात सर्वाधिक मताने राणा पाटील विजयी होणार यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. महाआघाडीच्या या वादळात कमळ आणि धनुष्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशभरात  या मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्ता भाजपने आणली त्या अच्छे दिनाचे हसू झाले आहे. असे म्हणत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सेना भाजपवर जोरदार टीका केली. पुढे ते म्हणले कि, भाजप सेनेने देशातील सर्वसामान्यांसमोर महागाईचा डोंगर उभारला आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लावला आहे. १५ लाखांचे स्वप्न  व दोन करोड वार्षिक रोजगार दाखवून तरुणाईला मोदींनि फसविले.
        यावेळी महाआघाडीचे उमेदवार रानाजगजितिसिंह पाटील,आ राहुल मोटे ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे,युंवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, भूम ता अध्यक्ष अण्णासाहेब देशमुख,बिभीषण खामकर,सुभाषसिंह सिद्दीवाल ,मधुकर मोटे , महादेव अंधारे,रणजित मोटे ,वाशीचे नगराध्यक्ष जाकेर  सौदागर, नितीन चेडे ऍड सुंदरराव हुंबे,विजयसिंह थोरात,तात्यासाहेब गोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी पाटील राजेंद्र गाढवे, दिलीप घोलप,आर डी सूळ,राजाभाऊ अंधारे ,विलास शाळू ,शिवाजीराव गाढवे,प्रवीण देशमुख,हनुमंत पाटूळे,ज्ञानेश्वर गिते , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोकळे,रवींद्र इंगळे,भाऊसाहेब मुंडे,अखतर जमादार,रुपेश शेंडगे,अण्णा महानवर ,सुग्रीव दराडे, ऍड नानासाहेब वणवे पाटील,आदिनाथ पालके , राजू साठे,ऍड सिराज मोगल,रोहन जाधव,संजय बोराडे,सतीश सोन्ने,अण्णा भोगील,लक्ष्मण गोलेकर , जयसिंग गोरे,संजय पाटील आरसोलीकर,राहुल पाटील देवळालीकर,युवराज तांबे,प्रदीप काकडे,भाऊसाहेब घरत,भाऊसाहेब मारकड,बालाजी कुटे , विनोद नाईकवाडी,अजित इंदलकर,अमोल औताडे यांच्यासह भूम परांडा वाशी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शेतकरी संघटना, आर पी आय कवाडे व गवई,एकतावादी गट चे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. या सभेत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तसेच महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती.
 
Top