प्रतिनिधी/उस्मानाबाद
जमिनीच्या खरेदीतून फसवणूक केल्याची घटना घडली असून शनिवारी (दि.१३) उमरगा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जीके विमल भाई (रा. साद्धात कॉलनी, शिवाजी कॉलेजसमोर उमरगा) याने पाच लाख ५० हजार रुपये भाग्यश्री डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस स्वत:च्या बँक खात्यावरून चैत्यला गावाजवळ जमीन खरेदी करण्यासाठी पाठवले होते. परंतु, चित्तरंजन रेड्डी व त्यांच्या पत्नीने जमीन खरेदीची नोंदणी केली नाही.
तसेच जीके विमल भाई यांना अद्यापपर्यंत पैसे परत दिले नाही. तसेच पैसे दिल्याची पावती दिली नाही. याप्रकरणी पोलिस ठाणे उप्पल (राज्य तेलंगणा) येथे गुन्हा दाखल होऊन कागदपत्र उमरगा पोलिस ठाण्यास प्राप्त झाले आहेत. जीके विमल भाई यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Top