उस्मानाबाद /प्रतिनिधी-
फेसबुकवर अश्लिल मजकुरासह फोटोची पोस्ट प्रसारीत करून बदनामी केल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.११) एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. अनिरुध्द सातलिंग म्हेत्रे (रा. तेर ता. उस्मानाबाद) याने संगणक किंवा फोनच्या माध्यमातून उस्मानाबाद येथील एका कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांच्या फोटोचे विद्रूपीकरण करून त्यासोबत आक्षेपार्ह व अश्लिल मजकूर लिहून फिर्यादी व नातेवाईकांची बदनामी करण्याचे उद्देशाने फेसबुकवर पोस्ट प्रसारीत केली. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून अनिरुध्द म्हेत्रे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. 
 
Top